शालेय उपक्रम आणि पुरस्कार

वार्षिक क्रिडामहोत्सव :-


शाळेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये क्रिडामहोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यर्थ्यांचा समावेश असतो. क्रिडामहोत्सवामध्ये सांघिक वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचे आयोजन असते. तसेच बेडूक उड्या, पोटॅटो रेस, लिंबू चमचा, लंगडी पळती अशा खेळांचाही समावेश असतो. नंबरात आलेल्या मुलांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र दिली जातात.

वार्षिक स्नेहसंमेलन :-


मुलांच्या अंगातीळ सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक वर्षी शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. स्नेहसंमेलनामध्ये पोवाडा, नाटक, इतर कलाप्रकार वै. मुलांकडून सादर केले जातात. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये वार्षिक परिक्षेमध्ये नंबरात आलेल्या विद्यार्थांचा, आय.टी.एस. परिक्षेमध्ये गुणवत्ता यादित आलेल्या विद्यार्थांचा, राज्यस्तरावर चमकलेल्या विद्यार्थांचा सत्कार केला जातो.

शालेय स्पर्धा आणि शालाबाह्य स्पर्धा :-


शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला मासिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिक म्हणून गोष्टीची पुस्तके दिली जातात. इचलकंरजी परिसरामध्ये विविध शाळांतर्फे व संघटनातर्फे आयोजित विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रवृत्त केले जाते. त्यांची तयारी करुन घेतली जाते. अशा विविध स्पर्धांमधून आमचे बरेचसे विद्यार्थी जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर चमकलेले आहेत.

स्पर्धा परिक्षेची तयारी :-


स्कॉलरशिप, आय.टी.एस. यासारख्या स्पर्धांची तयारी शाळेतच करुन घेतली जाते. त्यामुळे मुलांचा विषय पक्का होण्यास मदत होते. आतापर्यंत इ.४ थी च्या स्कॉलरशिप परिक्षेमध्ये आमच्या प्रशालेचा निकाल नेहमी १०० टक्के लागला असून असंख्य विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादित चमकले आहेत. तसेच आय.टी.एस. परिक्षेमध्येही बहुसंख्य मुलांनी यादीत स्थान मिळवले आहे.

बालवाडी विभाग शालेय उपक्रम


 • बेदूंर – खर्याो बैलजोडीची पुजा करुन त्यांचा सन्मान करून आदरभाव व्यक्त करणे.
 • पालक मिटींग – शिशुवर्ग व बालवर्ग पालकांची मिटींग
 • सर्व राष्ट्रीय नेत्यांची जयंती – आपल्या देशातील सर्व राष्ट्रीय नेत्यांची जयंती साजारी करणे, त्यांच्या कार्याची ओळख करुन देणे.
 • जीवन व्यहवार – बटाटे भाजी, ओली भेळ, मुगाची खिचडी, सरबत व मुलांच्या मदतीने तयार करणे
 • आषाढी दिंडी – पोजेक्ट, पायी दिंडी
 • गुरुपौर्णिमा-
 • लोकमान्य टिळक पुण्यतिथी – निमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
 • दिव्यांची अमावस्या – दिपू पूजन
 • नागपंचमी – सर्व मुलांच्या हातावर मेंदी काढणे.
 • राखी पौर्णिमा – शाळेमध्ये रक्षाबंधन केले जाते. शाळेतील मुली मुलांना राख्या बांधतात.
 • प्रजास्ताक दिन व स्वातंत्र्यदिन – शाळेमध्ये राष्ट्रीय सण ध्वजारोहन करुन साजरे केले जातात.
 • दही हंडी – गोपाळकाल्या निमित्त दही हंडीचा कर्यक्रम शाळेमध्ये साजरा केला जातो. पॅसेजमध्ये प्रोजेक्ट मांडले जातात व सर्व मुलांन्बा दडपे पोहे दिले जातात.
 • गणेश चतुर्थी – शाळेमध्ये श्री गणेश मुर्ती आणून त्याची स्थापना करून ५ दिवस षोडोपचारे पूजा करुन पाचव्या दिवशी विधिवत विसर्जन केले जाते.
 • शिक्षक दिन – शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.
 • क्रांतीदिन – ९ ऑगस्ट क्रांतीदिन साजरा करुन स्वातंत्र्या संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते.
 • विज्ञान प्रदर्शन – अभ्यासक्रमातील विविध विषयावर प्रदर्शन भरवले जाते.
 • घटस्थापना – शाळेमध्ये घटस्थापने दिवशी श्री देवीची स्थापना करुन नऊ दिवस उपासना केली जाते. व दरर्या–च्या दिवशी पाटीपुजन करुन विधिवत विसर्जन केले जाते.
 • दिवाळी – सहामाही परीक्षेनंतर शाळेमध्ये किल्ला तयार करुन मुलांना आकाश कंदिल देवून दिवाळी सुट्टी सुरु होते.
 • भोगी – भोगीनिमित्त शाळेमध्ये सर्व मुलांसाठी मुगाची खिचडी केली जाते. व सर्व मुलांना तिळगुळ वाटण्यात येतात.

प्राथमिक विभाग सहशालेय उपक्रम


निवासी संस्कार शिबीर

इ. ३ री व इ. ४ थी च्या विद्यार्थांचे निवासी शिबीर, विद्यार्थांना शाळेतच ठेवून घेवून त्यांना वेगवेगळ्या कला, कार्यानुभव, हस्तकला, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानांचे आयोजन, शेकोटी, सहल, जेवणखाण, विश्रांती व सर्व शाळेतच घेतले जातात.

वेगवेगळ्या विषयावर प्रदर्शन

अभ्यासक्रमातील विवध विषयावर विद्यार्थांच्या व पालकांच्या मदतीने प्रदर्शन आयोजित केले जाते.

क्रिडामहोत्सव

शाळेमध्ये वार्षिक क्रिडामहोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यामध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धा घेतल्या जातात. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जातात.

स्नेहसंमेलन

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगभुत सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षिस वितरण समांरभ, राज्यस्तरीय स्तरावर चमकणार्याल विद्यार्थ्यांचा सत्कार, विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, स्टाफ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समांरभ केले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

शैक्षणिक व परिसर सहली

शैक्षणिक विषयाचा संदर्भ घेवून परिसर सहली व शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. परिसरातील मोठमोठे प्रकल्प, कारखाने, ऎतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जातात. विद्यार्थी या सहलींचा आनंद घेतात.

प्रत्येक महिन्यात शालेय स्पर्धा

प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या विषयावर मासिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात यशस्वी विद्यार्थांना पालकांच्या हस्ते गोष्टीची पुस्तके बक्षिस म्हणून दिली जातात.

शालाबाह्य स्पर्धेमध्ये सहभाग

परिसरातील विविध शाळा, मंडळे यांच्यामर्फत आयोजित स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी सहभागी होवून यशस्वी होतात.

थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी

आपल्या देशातील थोर नेत्यांची जयंती व पुण्यातिथी साजरी केली जाते. त्यांनी आपल्या देशासाठी केलेल्या कार्याची ओळख मुलांना या उपक्रमातून दिली जाते.

पालक मेळावा

आपल्या पाल्याची प्रगती पालकांना कळावी यासाठी पालकांचा मेळावा आयोजित केला जातो. यामध्ये पालकांना पाल्याची प्रगती, पालकांच्या शंका, सूचना यावर चर्चा केली जाते.

पालकांना तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाते. यासाठी खास व्याख्यांत्यांना आमंत्रित करून पाल्याशी कसे वागवे, त्यांना कसे हाताळावे याबाबतीत मार्गदर्शन केले जाते.

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420