मुख्याध्यापिका मनोगत


मुख्याध्यापिका
अनंतराव भिडे विद्या मंदिर, मराठी माध्यम

नमस्कार...

आमच्या डी.के.टी.ई. सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष आदरणिय कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इचलकरंजी व परिसरातील मुला-मुलींना उच्च प्रतीचे प्राथमिक शिक्षण मिळावे या हेतूने दि.२ ऑक्टोबर १९८७ रोजी ”’अनंतराव भिडे विद्या मंदिर, मराठी माध्यम ’ ही शाळा सुरु केली. अल्पावधीतच आमच्या शाळेचा नावलौकिक झाला आहे. या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजते. या शाळेत गेली २८ वर्षे मी कर्यरत आहे.

द सचिव डॉ. सौ. सपना आवाडे वहिनी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सन्माननीय सदस्यांचे मार्गदर्शन व माझ्या सर्व स्टाफच्या सहकार्याने आमच्या शाळेच्या प्रगतीचा आलेख दरवर्षी उंचावत आहे. इचलकरंजी व परिसरामध्ये आमच्या शाळेचे नांव शिक्षणाबाबत अग्रक्रमाने आदराने घेतले जाते.

विद्यार्थांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगिण विकास करणे हे ध्येय समोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत. ज्यामुळे इ. ४ थी शिष्यवृत्ती परिक्षेचा आमच्या शाळेचा निकाल नेहमीच १००% आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त मुले गुणवत्ता यादित येण्याचा बहुमानही आम्हाला मिळाला आहे. अभ्यासाबरोबरच इतरही क्षेत्रात आमची मुले जिल्हा व राज्यस्तरावर चमकत आहेत.

पुढील वाटचालही यापेक्षा अधिक यशस्वीरित्या होण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असतील.....

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420