• slider
  • bootstrap slider
  • slider3
  • slider3
1 2 3 4
मुख्याध्यापिका मनोगत

मुख्याध्यापिका

शाळा म्हणजे ज्ञानसाधनेचे मंदिर! या ठिकाणी आपण ज्ञान मिळवून आपल्यातील कौशाल्य़ांचा विकास करून एक आदर्श होण्याचा प्रयत्न करतो... अधिक माहिती

प्राथमिक विद्यामंदिर, नारायण मळा


राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेली मॅचेस्टर नगरीतील एक उत्कृष्ट व एकमेव संस्था अर्थातच डी.के.टी.ई. म्हणजेच टेक्निकल एज्युकेशन सोसायटी इचलकरंजी याच उत्कृष्टतेच्या ध्येयातून या संस्थेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मराठी माद्यम व एंग्रजी माद्यामाच्या शाळा शहरात सुरू आहेत. प्राथमिक व बालवाडी विभाग - मराठी माध्यामाची दुसरी शाखा म्हणून संस्थेने सन २०००-२००१ या शैक्षणिक वर्षामध्ये नारायण मळा येथे पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिराची सुरुवात संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष, मा. श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या हस्ते १२ जून २००० या दिवशी झाली.

संस्थेचे मानद सचिव मा. श्री. रामकाका कुलकर्णी, मा. श्री. सी.डी. काणे सर, प्राथमिक विभागाच्या सेक्रेटरी मा. सौ. प्रतिभा काणेवहिन, अ.भि.वि.मं. च्या मुख्याध्यापिका मा. सौ. शेठ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रानडे मॅडम, कु.यु.पी. पाटील व सौ. पराडकर मॅडम, सौ.व्ही.एम. पाटील या स्टाफमेंबर शाळेची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला शिशुवर्ग विध्यार्थी संख्या मुले- ३१ व मुली -१४ एकूण ४५ अशी होती. तर इ. १ ली मुले - ३२ व मुली - १२ एकूण ४४ अशी होती. विद्यार्थ्याना शिकवताना वैयक्तिक लक्ष जास्तीत जास्त अध्ययन अनुभव, उदाहरणे, शैक्षणिक साधने, परीक्षेची पूर्ण तयारी, विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणींचा विचार व त्यानुसार वैयक्तिक लक्ष, विविध खेळ, उपक्रम, कृती, प्राथ्याक्षिके यांवर भर देण्यात आला. याबरोबरच पालक मेळाव्याचे आयोजन करून पालकांशी सुसंवाद साधून बालकाच्या सर्वागिण विकासाचा प्रयत्न केला गेला, अशा प्रयत्नातूनच सन २००७-२००८ सालीच्या इ. ४ थी स्कॉलशिप परीक्षेमध्ये आमच्या प्रशालेचा विद्यार्थी चि. योगेश सुरेश व्होण्ण्मणी याने राज्यात ३ रा क्रमांक व जिल्हातही ३ क्रमांक प्राप्त करून उज्वल यशाची परंपरा सुरू केली व ती अद्याप कायम आहे.

अधिक माहिती...

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420