मुख्याध्यापिका मनोगत


मुख्याध्यापिका
प्राथमिक विद्यामंदिर, नारायण मळा

शाळा म्हणजे ज्ञानसाधनेचे मंदिर! या ठिकाणी आपण ज्ञान मिळवून आपल्यातील कौशाल्य़ांचा विकास करून एक आदर्श होण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थाचा केवळ बौध्दिकच नव्हेतर सर्वांगिण विकासाठी शाळा प्रयत्नशिल असते. या करीता विद्यार्थ्याच्यात नवचैतन्या निर्माण करणाते राष्ट्रभक्तीची उपसाणा शिकवणारे, सामाजिक जाणिव देणारे, विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमात विद्यार्थी स्वत: सहभागी होऊन, स्वत: ज्ञानाने समृध्द कुटुंबाला समृध्द करून आणि भावी आयुष्यात, देशाला समृध्द करण्यासाठी वाटचाल करीत आहे.

कोवळ्या कळ्यातील कल्पनांना, कल्पलता बनवण्यासाठी सुरवंठाची कोशातून बाहेर येण्याची धडपड यशस्वी होण्यासाठी, आयुष्याच्या आभाळात, सक्षमपणे विहार करण्याची पंखात क्षमता येण्यासाठी आणि सागराची गंभिरता धारण करून विद्यार्थ्याला उभारी देण्यासाठी शाळेतील विद्यार्थी वर्गाला वक्तृत्व, कथाकथन, निबंध, चित्रकला, गायन, स्पर्धा परीक्षा यामध्ये सहभागी होणेसाठी प्रोत्साहन दिले जाते. यामुळेच तर आपली शाळा राष्ट्रिय स्तरावर, चमकत आहे. शाळेतील विद्यार्थानी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य व राष्ट्रिय स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे.

विविध स्पर्धा परीक्षा एन.एस.एस.ई. एम.टी.एस आणि शासकिय स्कॉलरशिप परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणात विद्यार्थांना सहभागी करून घेणे तसेच त्यासाठी शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, तज्ञांचे मार्गदर्शन, तासिकांचे सुयोग्य नियोजन व यातुनच शाळेचे उत्तुंग व वैशिष्ठपूर्ण यश घेवून शाळा यशाचे शिखर गाठण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असते. मुले म्हणजे देवा घरची फुले आहेत. या फुलांना हळुवार पणे फुलवायचे कसे? आजच्या स्पर्थेच्या युगात कोमेजू न देत त्यांचा सुगंध कसा दरवळू द्यायचा अशा पालकांच्या मनातील प्रश्नांना अचुक उत्तरे देता यावित यासाठी अभ्यासू विविध कला गुणांचे पैलू असणार्‍या तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन पालक प्रबोधन मेळातून केले जाते. शिस्त, स्वच्छाता, उपस्थिती, वक्तशिरपणा याबाबतितही शाळेची एक वेगळी प्रतिमा उमटलेली आहे.

सुसंस्कार शिबिर पालक मेळावे, शैक्षणिक प्रदर्शने, शैक्षणिक परिसर व मोठ्या सहली, विविध तज्ञांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मार्गदर्शन, क्रिडास्पर्धा, स्नेहसंमेलन अशा अनेक अंगांनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारी अशी आमची शाळा छोट्या रोपट्यापासून आता मोठ्या वटवृक्षाचे रुप धारण करण्याच्या मार्गांवर आहे.

"चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं.
उंच भरारी घेणार्‍याला आभाळाचं भय नसतं."


आणि त्यासाठी आवश्यक असणारी उभारी शाळा विद्यार्ध्यांना देत आहे.

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420